धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून निमंञितांचे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजन 7 आँक्टोंबर रोजी स.10 वाजता करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवितेविषयीचे आणि मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना कवी डॉ.मधुकर हुजरे यांनी वरील ओळींच्या माध्यमातून मराठी भाषेचे व मराठी कवितेचे महत्त्व विशद केले आहे. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यांना निमंत्रित कवींच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कवी संमेलनास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी निमंत्रित सर्व कवींचे ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन मराठी विभागाचे वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाचा नेमका उद्देश विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आपल्या मनोगतात ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हा मराठी भाषेचे वैभव पुढे वृद्धिंगत करणे ही आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण प्रत्येकाने नेटाने पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांनी अशा कवी संमेलनातून व्याख्यानातून निमंत्रित मान्यवरांचे आदर्श घेऊन आपणही त्या पायवाटेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा उपदेशही त्यांनी आपल्या मनोगतानतून विद्यार्थ्यांना केला. त्यानंतर कवींनी वेगवेगळ्या आशय आणि विषयाच्या बहारदार कविता सादर केल्या. यामध्ये बार्शी येथून आवर्जून उपस्थित असणारे कवी अशोक मोहिते यांनी सामाजिक जीवनाला अनुसरून समतावादी विचारांची पेरणी करणारी कविता सादर केली.