धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथील फार्मसी विभागामध्ये डॉ.व्ही. व्ही. माने, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली कोडींग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण यासंदर्भात एक्सपर्ट टॉक (तज्ञांचे मार्गदर्शन) अरेंज करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयाने शार्दुल भोसले सर यांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना भोसले सरांनी काळाच्या गरजेनुसार सध्या फार्मसी क्षेत्रात प्रगत होत असलेले रेग्युलेटर अफेयर्स, मेडिकल ट्रान्सलेशन, एडवर्स ड्रग रिएक्शन रिपोर्टिंग, फार्माको व्हिजिलन्स यासंदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करण्यासाठी लागत असणाऱ्या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाने त्यांच्यासोबत करार केलेला आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांना मेडिकल कोडिंग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण महाविद्यालयीन वेळेतच देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आज जगामध्ये सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण ऑफिशियल सर्टिफिकेट या तंत्रज्ञानाचे देखील प्रशिक्षण मिळणार आहे. ज्याचा विद्यार्थ्यांना पुढील नोकरी संदर्भात बराच फायदा होणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी नामांकित कंपनीतील जसे की टीसीएस मुंबई, कॅप जेमिनी, मुंबई, ऍडव्हान्टमेंट, पुणे, आयके सोल्युशन्स, मुंबई, गिब्स, छत्रपती संभाजी नगर येथील कार्यरत असणारे सॉफ्टवेअर इंजिनियर्स येणार आहेत. नियमित काम करत असणाऱ्या तज्ञांकडून प्रशिक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना या ट्रेनिंगचा नक्कीच फायदा होणार असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांनी व्यक्त केला. याआधीही महाविद्यालयाने असे अनेक विविध उपक्रम राबवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट नामांकित कंपन्यांमध्ये केलेली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख, डॉ. प्रीती माने यांनी केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गुरुप्रसाद चिवटे, प्रा. अक्षता हजगुडे, प्रा. ऋषिकेश हिंगमिरे, इतर प्राध्यापक, आणि आर. एल. मुंडे यांनी सहकार्य केले.