उमरगा (प्रतिनिधी)-  दि. 03-10- 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता प्रशालेत इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री व्यंकटराव गुंजोटे हे होते. यावेळी पालक श्री प्रमोद कांबळे, दत्तात्रेय सगर, सतीश चव्हाण,प्रकाश राजपूत, दिनकर आळंगे, नारायण जावळे, बालाजी मुसाडे, उमाकांत लोभे, अनिल कदम, बळवंत गायकवाड, बालाजी साठे, बलभीम साठे, गोविंद कडदोरे, विलास जाधव, नानासाहेब पवार, नागनाथ भोरे, सचिन परतापुरे,मारुती साठे, विकास माने, केरणात देवकर, मुकुंद माने, सुशांत मडोळे, श्रीहरी पाटील,हनुमंत क्षिरसागर, श्रीमती लतिका घोडके, आकाश सुरवसे ,मल्लिनाथ हुडगे, तुळशीदास सूर्यवंशी, अमोल पवार, बाळासाहेब मुसांडे,भैरू चव्हाण, सचिन जाधव, बहुसंख्य पालक यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली.  त्यानंतर प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व पालकांचा प्रशालेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मासिक सराव चाचणी परीक्षा पहिली मध्ये यशस्वी प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचा परीक्षा पॅड, रजिस्टर, व पेन संच देऊन गौरव करण्यात आला. 

त्यानंतर 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ उमरगा यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेमधील यशस्वी विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम कु. भोरे देवकीनागनाथ तर द्वितीय कु.रणखांब प्रणिता लक्ष्मण ही विद्यार्थिनी ठरली. तृतीय चिरंजीव रणखांब सोहन सचिन हा विद्यार्थी ठरला. तालुकास्तरीय निबंधस्पर्धेमध्ये कु.हुडगे गायत्री मल्लिनाथ ही विद्यार्थिनी प्रथम तर कु. बनसोडे शर्वरी दत्तात्रेय ही द्वितीय ठरली. त्याचबरोबर कु.ढोणे वैष्णवी किसन ही तृतीय ठरली.  विजेत्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  वाचन उपक्रम 2025-26मधील विजेत्या 09 विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रशालेत जून ते ऑक्टोबर पर्यंत वाचन उपक्रमांमधीलसहभागी विद्यार्थ्यांचा दररोजचा आढावा घेऊन स्पर्धक निवडले गेले. त्यामध्ये चि.सोहम आलमले, गौरवी साठे,ऋषिकेश माने, मनस्वी पवार, श्रद्धा पवार, वैष्णवी हुडगे,केतकी वाडीकर, वैष्णवी मोरे, कन्हैया कलशेट्टी हे विद्यार्थी यशस्वी ठरले.  रोटरी क्लब उमरगा चे अध्यक्ष धनंजय मेनू कुदळे, सचिव राजू जोशी, प्रोजेक्टर अनिल मदनसुरे यांच्या वतीने वरील सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संस्था दापोली यांच्यावतीने राज्यात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राष्ट्रीय कार्याचा आढावा घेऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशालेतील शिक्षक श्री राजेश्वर वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचाही प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

पालक मेळाव्याच्या प्रसंगी इयत्ता 10 वी च्याविद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये कु. करुणा जाधव, वैष्णवी शिरसागर, अवंती कोळी, पाटील विद्या, सायली सुरवसे, या विद्यार्थिनी होत्या.  चर्चा करत असताना पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करून प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये श्री आकाश सुरवसे, श्री नागनाथ भोरे, श्री नारायण जावळे,श्री मारुती साठे, रामभाऊ साठे, आदी पालकांनी काही प्रश्न उपस्थित करून खुल्या चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर शिक्षकांनीही आपल्यासमोर असलेले प्रश्न यावेळी उपस्थित केले. त्यामध्ये श्री राजेश्वर वाघमारे सर, अनिल मदनसुरे सर, अजित गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री व्यंकटराव गुंजोटे यांनी प्रशालेत असलेल्या विविध बाबींचा आढावा घेतला.वेगवेगळे उपक्रम त्याविषयीची माहिती पालकांना दिली. विद्यार्थ्यांमधील असलेल्या उनिवा पालकांना जाणीव करून दिल्या. पालकांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. व एकूणच संपूर्ण पालक मेळाव्यामधून पालक-शिक्षक व विद्यार्थी सर्वांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचे असे ठामपणे ठरवले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री गणेश साठे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दीपक शिंदे यांनी केले. आभार श्री अनिल मदनसुरे यांनी मांडले.

 
Top