कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान ; वसुंधरा पायी दिंडी सोहळा 2025 श्री क्षेत्र शिमुरगव्हाण (परभणी) ते श्री क्षेत्र नाणीज धाम (रत्नागिरी)  दि. 28 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत या वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिंडीचे आगमन धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे मांजरा नदीच्या तीरावर दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता झाले. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता ही दिंडी येरमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान केले. या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत कळंब तालुका व जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने उत्साहात करण्यात आले.

अंनत श्री विभूषीत जगदग़ुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या जन्मोत्सव वारीनिमित्त वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीत श्रींच्या पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत ही दिंडी किमान पाच किलोमीटर चालून आपली सेवाभाव श्री चरणी अर्पण करण्यासाठी दिंडीत मोठ्या संख्येने भक्तगणने सामील व्हावे असे आवाहन संप्रदायमार्फत करण्यात आले आहे. या दिंडी पर्यावरणाची करू रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा, अशा आशयाचे फलक घेऊन या दिंडीमार्फत ही जनजागृती केली जात आहे.  

या दिंडीसाठी वसुंधरा पायी दिंडी उत्सव समितीचे कळंबचे  दत्तात्रेय इंगोले, सचिव विठ्ठल काटे, विजय भारती, अरविंद मोरे, राजाभाऊ मुळीक, कल्याण बोराडे,जीवन चव्हाण, दिनकर डोंगरे, बाळासाहेब कानडे, गंगाधर ढवळे, प्रतिक जरंगे,महेश मुरगे, बाळासाहेब व्होंडे, प्रवीण खंडागळे, उमाताई गुंठाळ, मीरा माळी, जयश्री ढवळे, रमेश शिंदे, बाबा जाधवर, प्रदीप जाधवर, ज्योती पवार, पांडुरंग गव्हाणे, शिवाजी सारुक सहआधी परिश्रम घेत आहेत. 


या वसुंधरा पायी दिंडीच्या दर्शनासाठी आंदोरा येथे राष्ट्रवादीचे डॉ. प्रतापसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्यासह आदी मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेऊन भोजन स्थळी यांच्या हस्त वृक्षारोपण करण्यात आले.

 
Top