धाराशिव(प्रतिनिधी) येथील शासकीय विश्रामगृहात प्रा.अरुणा गंगाराम पोटे  यांना मुक्ता साळवे राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बीड येथे प्रा.डॉ.रमेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश एज्युकेटर सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मिळाल्याबद्दल बहुजन रयत परिषद आणि लहुजी शक्ती सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.अरुणा पोटे म्हणाल्या की, मुक्ता साळवे यांच्या नावाने मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.हे मी माझे भाग्य समजते. मुक्ता साळवे यांनी बहुजनांच्या दुःखांविषयी निबंध लिहून नेमका आमचा धर्म कोणता आहे ?  हा सरकारला प्रश्न वयाच्या चौदाव्या वर्षी विचारलेला होता. आणि त्यांनी जातीअंतासाठी प्रयत्न केला होता.या महान व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे मी कृतज्ञ झाले आहे असे त्या म्हणाल्या.   यावेळी त्यांनी सत्काराबद्दल बहुजन रयत परिषद आणि लहुजी शक्ती सेना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले.तर आभार बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगेश येडाळे यांनी मानले.   याप्रसंगी बहुजन रयत परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष  मीना धावारे, पदाधिकारी आम्रपाली माने, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे आदिसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top