धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक दिवाळीपूर्व  बी.टेक. प्रथम वर्ष (फर्स्ट इयर) या वर्गाचा पालकमेळावा दूरस्थ प्रणालीद्वारे (ऑनलाइन मोडमध्ये) उत्साहात संपन्न झाला. 

या पालकमेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व महाविद्यालय यांच्यातील संवाद वाढविणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व परिचयाने झाली. यानंतर प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी पालकांना संबोधित करताना महाविद्यालयाचे शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि नवोन्मेषी उपक्रम राबविण्याबाबतचे प्रयत्न स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे महाविद्यालय कटिबद्ध असून पालकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीजच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडणे यांनी विभागात आयोजित विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती पालकांना पीपीटीच्या माध्यमातून दिली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक पायाभरणीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

या बैठकीत भविष्यातील शैक्षणिक योजना, महाविद्यालयातील विविध कार्यक्रम, तसेच विद्यार्थ्यांच्या शिस्त, उपस्थिती आणि कार्यक्षमतेबाबत पालकांसोबत चर्चा करण्यात आली. 

पालकांनी केलेल्या सूचनांचे महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी जयराज मनसुळे,पृथ्वीराज जाधव, प्रिया ढोबळे, राधिका वडवले व गीता पुरी या विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच या पालक मेळाव्यामध्ये सदानंद मनसुळे, गणेश ढोबळे, अंजली माने, अंजली कवटेकर, बालाजी वडवले, धनंजय जाधव, नानसाहेब वाघमारे, रमाकांत तावरे, पुरी, लता सागर या पालकांनी ही आपली मते मांडली.

पालक मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. वर्षा पाटील, प्रा. दयानंद मुंढे, डॉ. राजश्री यादव, प्रा. आरती शिंदे, प्रा. ए. डी. बोरकर, प्रा. अनिरूध्द देशपांडे, प्रा. इंगळे सर. नेपते सर, नावकर सर, वाघमोडे सर, दिगंबर जाधव यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बालाजी चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. मनोज जोशी यांनी मानले. या मेळाव्यामुळे पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यात सुसंवादाचा सेतू अधिक मजबूत झाला.

 
Top