धाराशिव (प्रतिनिधी)-  तंत्रज्ञान कौशल्य वाढीसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिस्को नेटवर्किंग अकॅडेमी यांच्या संयुक्तीने,आर्टिफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायंस विभागातील शैकष्याणिक वर्ष 2024-25 द्वितीय वर्षातील एकूण 37 विध्यार्थी 'पायथॉन इसेन्शियल' हा सर्टिफिकेट कोर्स   मेहनत करून पूर्ण केला आहे.

या कोर्स साठी आर्टिफिकेशन इंटेलिजन्स व डेटा सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रदीप पवार यांनी 40 दिवसांचे विदयार्थ्यांचे प्रशिक्षण घेतले. नवशिक्यांसाठी आणि करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यां अभियंत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी  हा कोर्स एक उत्तम पर्याय ठरतो.  यात अनेक हँड्स-ऑन लॅब  आणि परस्परसंवादी क्विझ समाविष्ट आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकलेल्या संकल्पनांचा सराव करता येतो. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर तुम्हाला डिजिटल बॅज मिळतो, जो तुमच्या प्रोफाइलवर दाखवता येतो. यात पायथनच्या मूलभूत गोष्टींपासून ते ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग  पर्यंत अनेक विषय शिकवले जातात.

भविष्यात या मुलांकडून पायथॉन तंत्रज्ञानावर समाज उपयोगी नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करून घेणार आहोत  त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होईल व हे विद्यार्थी भविष्यात नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला आहे. सिस्को नेटवर्किंग अकॅडमीद्वारे हे कोर्स विनामूल्य उपलब्ध आहेत. कोर्स सर्टिफिकेट परीक्षेसाठी प्रा. कृष्णकांत मुळे आणि प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

 
Top