तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सुरत गाव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब घोडके यांनी काटगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या ते काटगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांशी थेट संपर्क साधत असून, घराघरात भेट देऊन जनसंपर्क मोहीम राबवत आहेत.

घोडके दांपत्य दोघेही सुरत ग्रामपंचायतीचे सदस्य असून, स्थानिक पातळीवर सामाजिक व विकासात्मक कामातून त्यांनी जनतेत चांगली ओळख निर्माण केली आहे. दादासाहेब घोडके हे 2009 पासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असून, “मेरा बूथ सबसे मजबूत” आणि “पंडित दीनदयाळ उपाध्याय मुक्कामी प्रशिक्षण” या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे जुने संबंध असून, कार्यकर्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर ते मतदारांपर्यंत थेट पोहोच निर्माण करत आहेत. त्यांचे काम आणि पक्षनिष्ठा पाहता, ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काटगाव जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय समीकरणे रंगू लागली असून, घोडके यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
Top