ढोकी (प्रतिनिधी)- ढोकी येथील अत्याधुनिक बसस्थानकाचे बांधकाम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघ यांना दिले आहेत. त्यामुळे ढोकीच्या बांधकामाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याबद्दल बस स्थानकासाठी यशस्वी पाठपुरावा करणारे शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांचा ढोकी ग्रामस्थांच्या वतीने शाल, फेटा व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

यापूर्वी ढोकी येथे ग्रामीण रुग्णालय आणि आता बस बस स्थानकासाठी देखील पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांचा हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, भारतीय जनता पार्टीचे नेते देशमुख, माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे नेते गब्बर  काझी, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख दौलती गाढवे, परिवार ग्रुपचे तालुकाध्यक्ष सतीश  वाकुरे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य उमेश माळी, प्रमोद कदम, श्रीराम सोमानी, पवन सोमानी, शिवसेनेचे नेते भारत देशमुख, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे नेते सिराजभाई मुल्ला, प्रभाकर गाढवे, शिवसेना शहरप्रमुख पंकज देशपांडे , शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण डोलारे, गफ्फार काजी, प्रमोद देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top