धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांच्यावतीने दरमहा तालुकास्तरीय शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.ऑक्टोबर 2025 महिन्यातील हे शिबिर परंडा येथे 23 ऑक्टोबर रोजी होणार होते. मात्र, भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे हे शिबिर आता 30ऑक्टोबर 2025 रोजी परंडा येथे नियोजित ठिकाणी भरविण्यात येणार आहे.सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.

 
Top