धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवावी असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे करुन निवडणुकीत उतरण्याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी केली.
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीच्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.9) शहराध्यक्ष सचिन तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. सदर बैठकीत प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी व चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वबळावर नगरपालिका निवडणुक लढवावी अशी एकत्रीत मागणी केली. तसेच नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीस समियोद्दीन मशायक अकबर पठाण, मनोज मुदगल, असद पठाण, मोहन मुंडे, विशाल शिंगाडे, विशाल साखरे, सतीश घोडेराव, सचिन सरवदे, संदीप बनसोडे, विवेक घोगरे, इलियास मुजावर, इफ्तेखार मुजावर, सुहास मेटे, निहाल शेख, सौरभ देशमुख, सलमान शेख, शांताराम लोंढे, विवेक साळवे, नारायण तुरुप, बालाजी वगरे, राजाभाऊ जानराव, अरातफ काजी, सुमित पापडे, डी. के. कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.