तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे तेरहून पंढरपूरला प्रस्थान झाले.
पालखी प्रस्थानचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हभप दिपक महाराज खरात,हभप रघुनंदन महाराज पुजारी, धनंजय पुजारी,पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, निरीक्षक अतुल नळणीकर, प्रशांत वाघ, साहेबराव सौदागर, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,नवनाथ पसारे, अजित कदम, ॲड.गजानन चौगुले, संजय जाधव, महादेव खटावकर, नागनाथ कुंभार,अशिष माळी,राहुल गायकवाड, उमाकांत शिंदे, अँड .दशरथ कोळेकर,विठ्ठल लामतुरे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
