तेर (प्रतिनिधी)- सभासद जागरूक असतील तर संस्था चांगली चालते असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. 

तेर येथील प्रभात सहकारी पतपेढीच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बागडे बोलत होते.यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, सरपंच दिदी काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी विभागीय सहनिबंधक संतोष फडणीस, जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे, सहसचिव संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. नाईकवाडी यांनी केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे, सहसचिव संतोष पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना राज्यपाल हरीभाऊ बागडे म्हणाले की, तेर छोटे गाव पण तेर येथील विविध  वस्तू पूर्वी परदेशात जात असत. पूर्वी धान्य पेढ्या होत्या.सहकारी संस्था संचालकांनी स्वतः च्या मालकीची समजली की, संस्था बूडीत निघते.ज्याची कर्ज फेडण्याची कुवत आहे त्यांनाच कज द्या.सहकारी संस्था टिकल्या पाहीजेत म्हणजे सभासदांचा विश्वास वाढत जातो असे प्रतिपादन केले.

 
Top