धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथील स्व. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठक देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आली याप्रसंगी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्ह्यातील पक्षाचे काम व स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी संदर्भामध्ये जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्याची भावना सविस्तरपणे मांडली याप्रसंगी संजय निंबाळकर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
