धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग  विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी नुकतेच प्रोजेक्टचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना अमलात आणून नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाचे उद्घाटन धाराशिवचे असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर सागर खटावकर महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सध्या स्पर्धेच्या युगामध्ये फक्त पदवी घेऊन नोकरीच्या संधी सहज मिळत नाही तर कौशल्यावर आधारित अनेक उपक्रमांमध्ये जेव्हा विद्यार्थी पारंगत होतो तेव्हा त्याला नोकरीच्या अनेक संधी सहज  चालू येतात. 

 याचाच एक भाग म्हणून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सातत्यपूर्ण कौशल्यावर आधारित अनेक उपक्रमाचे आयोजन केले जाते.

 आपल्या उद्घाटन पर भाषणात  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी तात्काळ अवगत करावे म्हणून महाविद्यालय सतत प्रयत्नशील असून स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया अशा पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना महाविद्यालय सतत राबवण्याचा प्रयत्न करत असून या मिनी प्रोजेक्ट मधूनच विद्यार्थी कौशल्य आत्मसात करत असून हेच विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणारे विकसित तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ म्हणून उद्या उपयोगी येणार आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर सागर खटावकर यावेळी बोलताना म्हणाले की, अशा प्रदर्शना मधूनच अभियांत्रिकी शाखेला आणि म्हणजेच विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळत असून या शाखेने येणाऱ्या नवनवीन कल्पना उपयोगात आणून त्यादृष्टीने प्रोजेक्ट सादर करावेत.  यावेळी त्यांनी त्यांच्या विभागात राबवित असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. ज्यामध्ये रोड मॉनिटरिंग, टोल तिकीटिंग, सिग्नल मॅनेजमेंट अशा विविध योजनांमध्ये विद्यार्थी कौशल्य वापरून काय करू शकतात याविषयी माहिती दिली.

 यावेळी विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते म्हणाले की येणाऱ्या युगात मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिवाय पर्याय असणार नाही.या प्रदर्शनात सादर केलेल्या कल्पनांचा वापर करून आधुनिक भारताच्या उभारणीत आमचे विद्यार्थी नक्की योगदान देतील असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात ऊर्जेचे पारंपारिक स्त्रोतावर आधारित मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून विद्यार्थी जास्तीत जास्त प्रोजेक्ट कसे बनवतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी व्हर्टीकल ड्रिलिंग मशीन, विंड पॉवर मेंटेनन्स, हायड्रोलिक लिफ्ट तसेच पर्यावरण पूरक शेतकरी आणि सामान्य नागरिकाला फायदा होईल असा रेन डिटेक्टर असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केल्याने प्रमुख अतिथी आणि स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  या प्रोजेक्ट प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून प्रा. आर एम शेख यांनी महत्त्वपूर्ण काम केले तर परीक्षक म्हणून प्रा. डी एच. निंबाळकर आणि  प्रा.आर.डी गुरव यांनी काम केले.  यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या  हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 
Top