धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या संकल्पनेतून धाराशिव पोलीस दला तर्फे नागरिकांना सुरक्षित, त्वरीत व पारदर्शक सेवा मिळावी. या हेतुने सुरक्षादुत नावाचे व्हॉटसअप चॅटबॉट कार्यन्वित करण्यात आले असुन एकुण 8 सेवा त्यामध्ये गुन्हा नोंदवा (सिटीजन पोर्टल), वाहतुक सेवा, महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे व जनजागृती, भाडेकरुची माहिती कळवा, आपले सरकार सेवा,अभिप्राय व आपत्कालीन संपर्क या सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 

नागरिकांनी 7796422525 या व्हॉटसअप क्रंमाकावर व्हॉटसअप द्वारे हाय असा मॅसेज केल्यास त्यांना वरील सेवांची यादी दिसुन येईल. त्यापैकी नागरिक त्यांना आवश्यक त्या सेवेचा लाभ घेवू शकतात. सदर चॅटबॉट धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे संकेत स्थळाशी सलग्न करण्यात आलेले असुन सदर सेवेचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक  विरेंद्र मिश्र यांच्या हास्ते करण्यात आले. सदरवेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अमंलदार तसेच कार्यालयनी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


 
Top