धाराशिव (प्रतिनिधी)-  वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक रितू खोखर उपस्थित होत्या. 

तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, चालक पोलीस हावलदार सुभाष चौरे, महेबुब अरब, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापुर येथील 34,60,860 रोख रक्कम व 2 किलो 722 ग्रॅम सोने त्याची किंमती 1 कोटी 78 लाख  58 हजार 897 असा एकुण 2 कोटी 13 लाख 19 हजार 703 किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपी यांचा योग्य तपास करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामुळे सत्कार करण्यात आला आहे.  

सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, शैकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दत्तात्रय राठोड स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सुर्व, पोलीस हावलदार शिवाजी राउत, भुजंग आडसुळ, राहुल खताळ, लक्ष्मण डिकाळे, सुर्यजित जगदाळे, पोलीस अंमलदार सागर कंचे, प्रमोद पेनुरकर, महिला पोलीस हावलदार शबाना सय्यद सर्व नेमणुक पोलीस ठाणे परंडा, सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उप निरीक्षक भोजगुडे, पोलीस अंमलदार जाधव पोलीस ठाणे येरमाळा यांचाही प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आले.

 
Top