धाराशिव (प्रतिनिधी)-  एनव्हीपी शुगर या कारखान्याने  अल्प कालावधीत सूक्ष्म नियोजन आणि शेतकऱ्यांचा विश्वास या बळावर उत्कर्षाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परीक्षक संदीपान महाराज हासेगावकर यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ संदीपान महाराज हासेगावकर आणि जनता बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागजी येथील प्रगतशील शेतकरी रंगनाथ सावंत, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, कडकनाथवाडी येथील विश्वनाथ पाटील, लेखा परिक्षक सचिन शिंदे, टेंभुर्णी येथील स्वराज ट्रॅक्टरचे वितरक हिम्मतराव पाटील, उमरगा- लोहारा विधानसभेचे युवा नेते अजिंक्य बाबा पाटील हे उपस्थित होते. 

हासेगावकर महाराज म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील हे उद्योग क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यामुळेच कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संत गोरोबा काकांच्या भूमीत औद्योगिक प्रगती पाहून समाधान वाटते. कारखान्याची पुढील काळात भरभराट होवो, असे शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी दिले. 

वसंतराव नागदे यांनी, साखर कारखाना हा चेहरा आणि चारित्र्य पाहूनच चालत असतो असे सांगून, विश्वास नसला तर शेजारी कारखाना असला तरी शेतकरी त्यांना ऊस न देता दूरच्या कारखान्याला ऊस देतो असे ते म्हणाले. तर आमदार प्रविण स्वामी यांनी एनव्हीपी शुगरची पुढील काळात टॉपच्या कारखान्यात नोंद होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.  यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचेही भाषण झाले.  प्रास्ताविकात चेअरमन नानासाहेब पाटील यांनी केले.  यावेळी कारखान्याचे अप्पासाहेब पाटील,  कार्यकारी संचालक कृष्णा नानासाहेब पाटील, धनंजय व्यंकटराव पाटील, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले यांच्यासह ऊस वाहतूक ठेकेदार, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top