धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्य सरकारने जाहीर केलेले 31,628 कोटींचे अतिवृष्टी मदत पॅकेज हे बळीराजासाठी मोठा दिलासा ठरले असून, धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा हातभार ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकट गुंड यांनी दिली.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून तातडीने घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आणि संवेदनशीलतेचा उत्तम आदर्श आहे. हे पॅकेज म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आहे.”

अँड. गुंड पुढे म्हणाले, “कोरडवाहू व बागायती शेती, व्यापारी, विद्यार्थ्यांपासून जनावरांचे मालकांपर्यंत सर्व घटकांचा विचार या निर्णयात करण्यात आला आहे. ‌‘ओल्या दुष्काळा'समान सुविधा देण्याचा निर्णय सरकारच्या जनहितैषी भूमिकेचे प्रतीक आहे. धाराशिवसह मराठवाड्यातील शेतकरी यामुळे पुन्हा उभारी घेतील. “बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवणे, हेच या मदत पॅकेजचे खरे यश ठरेल,” असे अँड. व्यंकट गुंड यांनी शेवटी सांगितले.

 
Top