भूम (प्रतिनिधी)- भूम -परंडा-वाशी तालुक्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर पुराच्या पाण्यामध्ये उतरून बऱ्याच लोकांचे प्राण देखील वाचवले आणि मदतही केली. मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून बऱ्याच दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली. त्यामुळे काही लोकांना त्याचा आधार आहे. अशा दानशूर दात्यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आभार मानून, आभार पत्राचे अनावरण केले आहे.
भूम परंडा वाशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊन स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महापुरामध्ये उतरून अनेकांचे जीव वाचवले व त्यांना आधार दिला. भयानक पूर परिस्थिती मध्ये गोरगरिबांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची नागरिकांची घरेदारी वाहून गेली, शेती वाहून गेली, जनावरे वाहून गेली, काही जनावरे दावणीला फास लागून मृत्यू पडली. भूम-परंडा-वाशी या तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. महापुरामध्ये काम करत असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कौतुक करत महाराष्ट्रातील सामाजिक संघटना, ग्रामस्थ मित्र मंडळ, तालीम संघ शिवसेना अंतर्गत संघटना यांनी शेतकऱ्यांच्या उघड्यावर आलेल्या संसाराला एक हात मदतीचा दानशुर व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना किराणा किट, जनावरांना चारा, कपडे ब्लँकेट रजई, धान्य, दुभत्या गाई, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना व रोख स्वरूपात रक्कम, अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे आणि आजही मदतीचा ओघ चालु आहे. मदत करणाऱ्या दानशूर दात्यांचे, सामाजिक संस्था, ग्रामस्थ, उद्योजक, क्रीडा मंडळ, डॉक्टर असोसिएशन, इतर दानशूर दात्यांकडून मदत होत असल्याने त्यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आभार मानले जात आहे. यावेळी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, जिल्हा संघटक भगवान बांगर, माजी शहर प्रमुख दीपक मुळे, महिला भूम शहर प्रमूख ज्योती आडागळे उपस्थित होते.
 
