धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे अभूतपुर्व नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या घरात लग्न कार्य ठरले आहेत. परंतु अतिवृष्टीने सगळे काही हिरावले गेले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यात 6 व 7 फेब्रुवारी 2026 रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवार दि. 27 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, झेडपी माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, ॲड. नितीन भोसले, युवराज नळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे इच्छुक विवाह करणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी. या सामुहिक विवाह सोहळ्याचा खर्च तेरणा ट्रस्ट व तुळजाभवानी ट्रस्ट व इतर दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून केला जाणार आहे. 

खरीप गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे गरजुवंत विवाह इच्छुक परिवाराला मदत करण्यासाठी या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 


 
Top