उमरगा (प्रतिनिधी)- दि. 02 ऑक्टोबर रोजी मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम 2025-26 साठीया बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री, अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, लातूर जिल्हा (ग्रामीण) व विठ्ठलसाई कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
श्री विठ्ठलसाई कारखान्याचे कामकाज बसवराज पाटील याच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरू असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून जवळपास 14000 हेक्टर उत्साची नोंद झालेली आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने 5 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चीत केले आहे. यासाठी पुरेशी ऊसतोड व वाहतुक यत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम पुढील आठवडयात होणार आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देण्यात येणार असून कोणाचाही ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी यावेळेस दिली. याप्रसंगी बापुराव पाटील, चेअरमन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., धाराशिव, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादीकसाहेब काझी, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, ॲड. सुभाषराव राजोळे, अनिल सगर, रहेमान जमादार, गोविंदराव पाटील, भालचंद्र लोखंडे, शरणप्पा कबाडे, सचिन पाटील, केशवराव पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
