धाराशिव (प्रतिनिधी)- येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस संघटनेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब माने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अरुण बनसोडे, सुनिल बनसोडे, तुकाराम बनसोडे, अशोक बनसोडे, आडसूळे, एस.के. शेरखाने अच्युत सरवदे, राजन माने व इत्यादी संघटनेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.