तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच उपनेते ज्ञानराज चौगुले, माजी पालकमंत्री तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष मोहन पनोरे तसेच जिल्हा संपर्कप्रमुख भगवान देवकते, तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या सहकार्याने कुंभारी या गावात गरजू व गरीब लोकांना अत्यावशक वस्तू व किराणा किटचे वाटप समस्त ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी एकनाथ फाउंडेशन, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विकास जाधव पाटील, दिपक थोरात, पंडित पाटील, विठ्ठल वडणे, भीमा पारधे, उमेश तांबे बाळासाहेब वडणे, अंगद वडणे, प्रताप तांबे व जेष्ठ नागरिक यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.