तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव येथे बंजारा समाजाचा बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे तसेच ऐतिहासिक नोंदी , इंग्रजकालिन दस्तऐवज, आयोगाचे अहवाल अशी संविधानिक मागणी असल्याने या सर्वावरुन बंजारा समाज आदिवासींच असंल्याचे सिध्द झाले आहे.
या महामोर्चा साठी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, गोर सिकवाडी लढाऊ विजय चव्हाण उपस्थित राहणार आहेत तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव या ऐतिहासिक महामोर्चा साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, दिलीप जाधव,,विशाल जाधव, सुरेश पवार,हरिष जाधव,सुरज चव्हाण, बालाजी राठोड,मोहन राठोड,कालीदास चव्हाण, दत्ता पवार, महादेव राठोड, उत्तम चव्हाण, बाबुराव राठोड, विजय राठोड यांच्या सह बंजारा बांधव उपस्थित होते.