धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता नॅचरल शुगर युनिट 3 चा 2 रा गळीत हंगाम २०२५-२६ चा बॉयलर अग्निप्रदम समारंभ डॉ. दिलीप कामत, डायरेक्ट कामत हॉस्पिटल पुणे, डॉ. रत्नदीप जाधव, डायरेक्ट रत्नदीप डेंटल हॉस्पिटल पुणे, ॲड. मकरंद भारत कठारे, मुंबई हायकोर्ट या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना संस्थापक ॲड. 

गुंड यांनी कारखाना चांगल्या पद्धतीने प्रगती करत असून या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी सक्षम ऊस वाहतूक यंत्रणा उभी केली असून कारखाना गाळपास सज्ज असल्याचे सांगितले तसेच ऊस उत्पादकांनी आपल्या या हक्काच्या कारखान्यात ऊस देण्याचे आवाहन केले. कारखान्यातील प्रत्येक घटकाने पप्रयत्न केल्यास आपण जास्तीत जास्त गळप करू शकू असेही त्यांनी संगितले. 

मान्यवरानी आपल्या भाषणात कारखान्यास या वर्षीच्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कारखान्याचे केन ऑफिसर श्री.धनंजय गुंड यांनी केले.

कार्यक्रमास चिफ इंजिनियर तानाजी ढेकळे, चिफ केमिस्ट अनिल जाधव, शेतकी अधिकारी धनंजय पाटील व प्रेमनाथ पाटील, उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी सभासद बंधू, कारखाने सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top