भूम (प्रतिनिधी)- नितीन दादा जाधव मित्र मंडळ पुणे तर्फे आष्टा तालुका भूम येथील पूरग्रस्त शेतमजूर व बाधित शेतकऱ्यांना किराणा मालाचे किट व ब्लँकेट वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली शेती पिक वाहून गेले, जनावरे दगावली.तसेच घराची पडझड झाली, संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
आम्ही एक सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. भूम तालुक्यात अनेक शेतकरी अल्पभूधारक तसेच भूमिहीन आहेत तर अनेक शेतमजूर कुटुंब आहेत. आशा बाधित अल्पभूधारक शेतमजुरांना आष्टा येथील संत बाळूमामा मंदिर येथे किराणा मालाचे किट व ब्लँकेटचे वाटप करून माणुसकी जोपासली असल्याचे मत सदर वाटप प्रसंगी नितीन जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी पुणे येथील सहकारी गुरुनाथ शेठ हडदरे व आष्टा येथील बाधित शेतकरी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.