धाराशिव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफी द्यावी तसेच हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी दि.17 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे आकाश कंदील काळे फुगे फोडून आंदोलन करण्यात आले.

याबाबत सरकारने मदतीचा आकडा सांगितला आहे. मात्र प्रत्यक्षात होणाया मदतीमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांची फसवूण झालेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक न करता त्यांना तातडीने शेती कर्ज माफ करावे. तसेच हेक्टरी 50 हजाराचे अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठम माने, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, लोहारा तालुकाध्यक्ष नरदेव कदम, डॉ.मोहन बाबरे, ॲड. प्रविण शिंदे, इकबाल पटेल, अनिल जाधव, भारत शिंदे, भगवंतसिंग बायस, गुंडाप्पा गाजरे, लिंबराज लोकरे, गौतम क्षिरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शेतकरी, युवक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top