तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत 2003 बॅचचा तब्बल 22 वर्षानंतर एकत्रित येऊन हितगुज साधण्याचा योग दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आला. येथील जैन सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित स्नेह मेळाव्या प्रसंगी 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ऐतिहासिक अविस्मरणीय स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. सकाळी दहा वाजता प्रशालेचे माजी शिक्षक श्रीमंत धर्म. पाथरूड. हंगरकर. हरिदास मुळे. वेगळे. रमाकांत गुरव, शिडोळे, फंड या गुरुजनांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेह मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेमधल्या आठवणी जाग्या केल्या, गुरुजनांबद्दल असलेली आदरयुक्त भिती बद्दल असलेला आदर. शालेय जीवनात घडलेले अविस्मरणीय प्रसंग. शाळेच्या बाहेरचे 22 वर्ष. जीवन मार्गक्रमातील सुखदुःख या अनेक विषयांवरती शब्दबद्ध होऊन मन मोकळे केले. तुम्ही विद्यार्थी शालेय जीवनात असतानाची परिस्थिती अत्यंत बिकट होती, ग्रामीण भागातून विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागायची आत्तासारखा काळ नव्हता अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी तन-मन-धनाने जिल्हा परिषदेसारख्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन अभियंता, शिक्षक, उद्योजक प्रगतशील शेतकरी शासकीय निमशासकीय नोकरदार होऊ शकलात याचा आम्हाला गुरुजन म्हणून अभिमान वाटतो असे प्रतिपादन पाथरूड यांनी केले. दुपारी स्नेहभोजन झाल्यानंतर संगीत खुर्ची परिचय होऊन समारोप झाला. माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात प्रस्ताविक श्यामसुंदर माने यांनी केले. आभार भारत डोके पाटील यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काडगावकर यांनी केले.
स्नेहा मेळाव्यातून जोपासला माणुसकीचा धर्म वर्ग मित्राच्या मुलींना 21 हजाराची आर्थिक मदत.
2003 दहावी बॅचमधील माजी विद्यार्थी दत्ता वाकळे यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पश्चात लहान निरागस दोन मुली आहेत,कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी, दत्ता यांच्या छायेखाली असणाऱ्या कुटुंबासमोर त्याच्या आकस्मित जाण्यानंतर लहान मुलांच्या शिक्षणाचे संकट उभे राहिले होते. माणुसकीचा धर्म जोपासत सामाजिक बांधिलकी म्हणून वर्ग मित्रांनी 21 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली.
