भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या बेलगाव येथील शेतकरी परिवाराला आघाडीचे कीर्तनकार हभप विशाल खोले महाराज यांच्याकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत काल रोप स्वरूपात दिल्या गेल्याने शेतकऱ्याच्या मदतीला वारकरी संप्रदाय धावून आला असल्याचं काल दिसून आलं भूम तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने अनेक गावात लाखो रुपयांचे नुकसान होऊन यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जनावरे व जमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या परिस्थितीत शासनाने अनेक सामाजिक संस्था काही पुढारी यांनी या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात मदती केलेल्या असताना काल तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी सोमनाथ दातखीळे यांना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प विशाल खोले महाराज मुक्ताईनगर यांनी एक लाख रुपयांची रोख स्वरूपातली मदत काल त्यांना बेलगाव येथे जाऊन भेटून सुपूर्द केली व राज्यातील वारकरी संप्रदाय शेतकऱ्यासोबत असल्याचं सांगितलं यावेळी रामानाचार्य विदर्भ रत्न ह भ प संजय महाराज पाचपोर यांच्या शुभहस्ते शेतकरी सोमनाथ दातखीळे यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देऊन त्यांना पाठबळ दिलं भूम परंडा वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आसमानी संकट उभा राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे ते भरून येणे शक्य नाही परंतु जगाचा मालक विठुराया खंबीरपणे आपल्याला यातून बाहेर काढेल असं यावेळी ह भ प खोले महाराज यांनी सांगून संपूर्ण वारकरी संप्रदाय शेतकरी बांधवांच्या पाठीमागे असल्याचं यावेळी सांगितलं वारकरी संप्रदायाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांस आर्थिक मदत दिली गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्याकडून वारकरी संप्रदायाचे आभार व्यक्त होत आहेत यावेळी ह भ प बालाजी महाराज बोराडे ह भ प आसाराम साबळे बाळासाहेब क्षिरसागर महादेव वडेकर व योगेश महाराज असलकर हे उपस्थित होते.