धाराशिव (प्रतिनिधी)- एकही मराठा आंदोलक उपाशी नाही राहणार असा संकल्प आमदार कैलास पाटील यांनी करीत आझाद मैदानाजवळ शिवसेनेने सेंट्रल किचन सुरू केले आहे. यात सकाळ, दुपार व संध्याकाळी असे 3 वेळ जेवणाची सोय केली जाणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसापासून उपोषण करत असून, आज चौथा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसात आंदोलकांची गैरसोय व्हावी म्हणून प्रशासनाने जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. आंदोलकांना खारघरच्या पुढे येवू न देणे, तसेच हॉटेल्स बंद ठेवून अन्न पाण्यापासून वंचित ठेवणे, हेस र्व जाणीवपूर्वक केले गेले. असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले आहे की, मुंबईत आलेल्या प्रत्येक मराठा समाज बांधवांची सोय शिवसेनेच्या वतीने केली जावी. त्यानुसार धाराशिव शिवसेनेच्यावतीने आझाद मैदानालगतच्या पत्रकार भवन येथे सेंट्रल किचन आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले आहे. या अन्नछत्रातून सकाळी, दुपारी व संध्याकाळीही जेवणाची सोय केली जाणार आहे. आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, जोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरू आहे तोपर्यत हे अन्नछत्र चालू राहील. आरक्षणासाठी आलेला कोणताही आंदोलक उपाशी राहणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच लांब कुठेतरी सोय करणे ऐवजी आम्ही आझाद मैदानालगतच समाज बांधवांसाठी थेट जेवणाची सोय केली आहे. 


 
Top