तुळजापूर (प्रतिनिधी): माऊली नगर, तुळजापूर येथील माऊली तरुण मंडळाच्या वतीने महा होम मिनिस्टर 2025 हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सीने अभिनेता सचिन सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक शेगडी, सोन्याची नथ यासह तब्बल 70 पेक्षा जास्त बक्षिसे लकी ड्रॉच्या माध्यमातून सहभागी महिलांना देण्यात आली. यामध्ये विशेष आकर्षण ठरलेले सोन्याची नथ व पैठणी (10), मिक्सर (2), कुकर (20), इस्त्री (20), पोळी डबा (20) यांसह अनेक बक्षिसे देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रियाताई विजय गंगणे, भारतीताई नारायण गवळी व रोहिणीताई रामचंद्र रोचकरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन सूरज नन्नू, दादा साठे व माऊली तरुण मंडळ यांनी केले होते. यावेळी मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.