तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरात उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती विराजमान आहे. गणेशोत्सवाच्या काळात या दैवी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
उजव्या सोंडेचा गणपती शुभ, सिद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. मंदिर परिसरात गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा-अर्चा पार पडतात. सिद्धिविनायकाच्या दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. असल्याने सिध्दीविनायक दर्शनार्थ गणेशोत्सव भाविक मोठ्या संखेने दर्शनार्थ येतात. या विशेष गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्याने भक्तांना एकाचवेळी तुळजाभवानी मातेसह सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळतो, हा या उत्सवाचा हटके आध्यात्मिक सोहळा ठरतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राजेनिबाळकर महाद्वाराच्या बाजूलाच उजव्या सोंडेची विभुषण मुक्त अशी श्री सिध्दी विनायकाची अतिप्राचीन गणेशमुर्ती आहे.
श्रीतुळजाभवानी पार्वती अवतार मानल्यामुळे मंदीरात सर्वञ गणेश मुर्ती
तुळजाभवानी ही पार्वतीचा अवतार मानली जाते. श्रीगणेश हा पावर्ततीचा पुत्र असल्याने श्री तुळजाभवानी मंदिरात आदी देवीच्या चांदीच्या सिंहासनापासून ते शिखरापर्यंत विविध ठिकाणी श्रीगणेश मुर्ती आढळतात. राजेनिंबाळकर महाद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला उजव्या सोंडेच्या श्रीगणेश मुर्ती आहेत. होमकुंडश शिखराच्या अग्रभागीही शारदा श्री गणेशाचे पाय दाबत असल्याची छोटीशी पण अप्रतिम गणेश मुर्ती आहे. या शिखराच्या समोरच्या आणि मागणच्या बाजूलाही गणेशमुर्ती आहेत. तसेच पितळी दरवाजा व पितळी कडीवरही चांदीच्या गणेश मुर्ती आहेत. देवीच्या मागील बाजूच्या दरवाज्यावरही श्री गणेशमुर्ती आहे. तुळजाभवानी मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस येथे गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करतात. अनंत चतुर्थी दिवशी देवीचा छबिना व गणेश मुर्तीच्या मिरवणुकीचा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानंतर श्री कल्लोळ तिर्थकुंडात विधीवत गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येते.