तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर खुर्द येथील जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच यांच्या वतीने दि 29 ऑगस्ट रोजी तुळजापूर खुर्द येथे पशुचिकित्सा शिबीर व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जनावरांची गर्भतपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, बकऱ्याची हगवण व सर्दी खोकला तसेच तोंडाला जखमा होणे आदी रोगांवर उपचार व निदान करण्यात आले.
जनावरांना मुख्यता गोचीड नियंत्रण, गर्भतपासनी व जंत निर्मूलन याकरिता विशेषता उपचार देण्यात आले. काही जनावरांना गर्भ राहत नसल्यामुळे त्याकरिता विशेष उपचार जनावरांना देण्यात आले. या शिबिरात एकूण 154 जनावरांची तपासणी व लसीकरण उपचार या ठिकाणी पुरवण्यात आले यामध्ये शेळ्या 85 तसेच बैल 15 आणि गाई 34 व म्हैस 20 अशाप्रकारे सर्व प्राण्यांना सेवा प्रदान करण्यात आली.या शिबिरास सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.रेड्डी सर
पशुधन पर्यवेक्षक डॉ.कचरे सर,डॉ. केदार जाधव परिचर बिराजदार यांचे सहकार्य लाभले तसेच हे शिबीर ॲड.अजिंक्य नन्नवरे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले तसेच या शिबिरास अध्यक्ष कृष्णा भोजने, उपाध्यक्ष शुभम जाधव, सचिव मंगेश कुंभार, ओंकार भोजने, माऊली भोजने, सोमनाथ भोजने, महेश चव्हाण, अजय गायकवाड, आकाश भोजने, विश्वास भोजने, अर्जुन भोजने, अभिजित भोजने, हरिदास भोजने,रोहित भोजने उपस्थीत होते.