धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूृलमधील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले क्रीडाशिक्षक विक्रम सांडसे व शिवाजी धोंगडे यांचा सत्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला .

या सत्कार समारोहात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव प्रेमाताई पाटील प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कारीत करण्यात आले. या सत्कारप्रसंगी साहेबराव देशमुख, सूर्यकांत पाटील, कमलाकर पाटील यांनी सेवानिवृत्तांबद्दल आपल्या आठवणी व्यक्त केल्या. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, शिवकुमार लगाडे ,उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांनी अध्यक्षीय समारोपीय भाषणात सत्कारमूर्तीना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आनंदी जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे यांनी केले. सूत्रसंचलन पर्यवेक्षक राजेंद्र जाधव व आभार मानले.


 
Top