धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय उद्योजकता आव्हान (एनईसी) चा भाग म्हणून, आयआयटी मुंबईच्या ई-सेलने आयोजित युरेका या आशियातील सर्वात मोठ्या बिझनेस मॉडेल स्पर्धेमध्ये तेरणा अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  ऑनलाइन भाग घेतला. यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बिझनेस मॉडेलची निवड झाली आहे. 

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात वेगवेगळे संशोधन व्हावे म्हणून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर प्रोजेक्ट मध्ये व प्रोजेक्टचे रूपांतर बिजनेस मध्ये होण्यासाठी सातत्याने महाविद्यालयातील प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मागील वर्षी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र युनिव्हर्सिटी चॅलेंजमध्ये प्रत्येकी एक-एक लाख रुपये बक्षीस मिळवले आहे. त्याचबरोबर मागील काळात ही विद्यार्थ्यांनी मानवी रोबोट, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेईकल या सारखे महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट ही बनवले होते. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्समध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ई-सेलने आयोजित युरेका या आशियातील सर्वात मोठ्या बिझनेस मॉडेल स्पर्धेत भाग नोंदवला. उत्कर्ष नरेश म्हात्रे, उत्कर्ष सतीश रामपुरे आणि साहिल सिंग या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या 3 विद्यार्थ्यांना झोनल लेवलला आयआयटी मध्ये जाऊन आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण करावयाचे आहे. 


यांचे मार्गदर्शन

या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने, महाविद्यालयातील रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे डीन डॉ.सुशीलकुमार नाथराव होळंबे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या निवड झाल्याबद्दल तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थींचे अभिनंदन केले आहे.

 
Top