धाराशिव (प्रतिनिधी) - बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पुरोहित मुक्त करण्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू व दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी या मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा दक्षिणच्यावतीने दि.17 सप्टेंबर रोजी महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर बसून महाबोधी महाविहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू आणि दीक्षाभूमी पुरोहित मुक्त करा, आदी मागण्या करीत गगनभेदी घोषणांनी एक तासभर परिसर दणाणून सोडला.

बिहार राज्यामधील बोधगया येथील महाबोधी विहारावर पुरोहितांनी ताबा मिळवला आहे. त्यामुळे ते बौद्धांच्या ताब्यात देऊन महाबोधी विहार पुरोहित मुक्त करावे. तर मध्य प्रदेशातील महू हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी. या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातील भीम नगरमधील क्रांती चौकातून दुपारी साडेबारा वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट कार्यालय चौक, अंबाला हॉटेल, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास धडकला. यावेळी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या दिल्यामुळे रस्ता दुतर्फा बंद झाल्यामुळे दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, या दरम्यान दोन रुग्णवाहिका आल्या, आंदोलकांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन दिला. यावेळी उपस्थित आंदोलकांना कराळी येथील भन्ते सुमंगल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड अजित डिकले, रिपाइंचे राज्य जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजश्री कदम, दक्षिण जिल्हा संघटक सुधीर कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे व उत्तरचे सरचिटणीस दिलीप निकाळजे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात पंचशील व बुद्ध वंदना करीत तथागत गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश देण्यात आला.    

यावेळी विश्वास पांडागळे, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, बागडे शरद, सचिन दिलपाक, अनिल सरतापे, किरण धाकतोडे, बाबासाहेब बनसोडे, सुधीर कांबळे, सुधाकर गायकवाड, ब्रह्मानंद गायकवाड, तानाजी माटे, वैभव सिरसाट, आनंदकुमार कांबळे, विजयमाला धावरे, आर.टी गायकवाड, सुभाष सोनवणे, बाबासाहेब घरबुडवे, राजेंद्र धावरे, विठ्ठल सुरते, राकेश जेटीथोर, विनोद आचार्य, बाळासाहेब खरोसे, दिपक सोनकांबळे, धनंजय वाघमारे, बापू जावळे, गौतम हुंबे, राजाभाऊ बनसोडे, राजाभाऊ कदम, संतोष सुरवसे, अंकुश भंडारे, आम्रपाली गोटसुर्वे, सीताताई सोनवणे, रोहिणी बर्वे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, संजय बनसोडे, सिद्धार्थ ओहाळ, रणजीत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब माने, धम्मशील कदम, बाबासाहेब मस्के, मुकेश मोठे, संतोष झेंडे, अंकुश नटराज, संदीप अंकुश,  वंचितचे मिलिंद रोकडे, तानाजी बनसोडे, युवकचे शीतल चव्हाण, महिला आघाडीच्या अनुराधा लोखंडे, रुक्कमीन बनसोडे, बाबासाहेब वाघमारे, सागर चंदनशिवे, मिलिंद रोकडे, जीवन कदम, ज्ञानेश्वर बनसोडे, जिवन कदम, भारतीय बौद्ध महासभा जि.शा.उत्तरचे जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे, सरचिटणीस दिलीप निकाळजे यांच्यासह भारतीय भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव (द) व समता सैनिक दल, बी आर आंबेडकर ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा उत्तर, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्यासह विविध संस्था व संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

 
Top