नळदुर्ग (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील मुक साक्षीदार असलेल्या व ज्या पुलावर दि. 13 सप्टेंबर 1948 रोजी रक्तरंजीत क्रांती घडली त्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजन दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त नळदुर्ग वासियांनी केले.

नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक व ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी हे गेल्या अनेक वर्षांपासुन  ऐतिहासिक आलियाबाद पुलाच्या पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. याहीवर्षी त्यांनी पुलाचे पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षीही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व शहीद बचीत्तरसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजन करण्यात आले.

यावेळी बलभीमराव मुळे, कमलाकर चव्हाण, नितीन कासार, विलास येडगे, सुहास येडगे, प्रा.दीपक जगदाळे, दादा बनसोडे,सुशांत भुमकर,सुनिल उकंडे, सौ.कविताताई उकंडे,पांडुरंग पुदाले, पद्माकर घोडके, पप्पु पाटील, बंडाप्पा कसेकर, किशोर बनसोडे, ज्ञानेश्वर घोडके, सतीश पुदाले, देवानंद बनसोडे, मुकुंद भुमकर, रविंद्र होर्टिकर, विकास वैद्य,आप्पु स्वामी, मोहसिन फुलारी, विकास राठोड,उमेश जाधव,दत्तात्रय कोरे,विशाल डुकरे, संजय विठ्ठल जाधव,श्रमिक पोतदार,अक्षय भोई, संजय बेडगे, जमन ठाकुर,अमर भाळे, प्रदीप ग्रामोपाध्याय, अजय देशपांडे, ज्ञानेश्वर केसकर,संदीप वैद्य,मनोज तडवळकर, भीमाशंकर बताले, सौरभ रामदासी आदीजन उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा विनायक अहंकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विनायक अहंकारी यांनी स्वता आलियाबाद पुलावर रांगोळी काढुन पुल फुलांनी सजविला होता.

 
Top