भुम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावीचे विद्यार्थी साबळे कुणाल (ग्रीको-रोमन) व गाडे संकेत (फ्री-स्टाईल, 65 किलो गट) यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाचा मान उंचावला.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, उपप्राचार्य प्रा. राम सोळंके व क्रीडा शिक्षक प्रा. महेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या प्रसंगी गंगाधर काळे, प्रा. डॉ. गोकुळ सुरवसे, प्रा. माळी, प्रा. व्यंकटेश माने व ग्रंथपाल हरीभाऊ महामुनी उपस्थित होते. या विजयामुळे तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
