भूम (प्रतिनिधी)- भूम शहरात काल गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील सहा गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका काढून उत्सव साजरा केला. मिरवणुकीला डीजे मुक्त वातावरण ठेवण्यात आले होते, तसेच बहुतांश मंडळांनी जागेवरच विसर्जन करून पर्यावरणपूरक उपक्रमाला पाठिंबा दिला.
श्रीमंत समर्थ नगर गणेश मंडळाने महिलांसाठी टाळ कार्यक्रम, मुलींसाठी ढोल पथक, तसेच लहान मुलांसाठी टिपऱ्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नगरपरिषदेच्या समोर नागोबा तरुण गणेश मंडळ, चौडेश्वरी तरुण गणेश मंडळ, कल्याण स्वामी तरुण गणेश मंडळ आणि जय भवानी तरुण गणेश मंडळ यांनी लहान मुलांचे गाणे सादर केले. बार्शी येथील ढोल पथकानेही कार्यक्रमाने रंगत आणली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, आणि पोलीस निरीक्षक यांनी नगरपरिषदेच्या समोर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
महायुतीकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान
गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतेही विघ्न न येऊ देता ती शांततेत पार पडल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि सर्वपक्षीयांच्या वतीने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या समोर सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, विनोद नाईकवाडी (नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट), संतोष सुपेकर (तालुका भाजपा अध्यक्ष, भूम), आबासाहेब मस्कर (सरचिटणीस भाजपा), बाबासाहेब वीर (मंडळ अध्यक्ष, भूम), गणेश साठे (सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सिद्धार्थ जाधव, पत्रकार शंकर खामकर, अमोल सुरवसे, आकाश शेटे तसेच भूम शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि पत्रकार उपस्थित होते.
