तुळजापूर (प्रतिनिधी)- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 ऑगस्ट 1952 रोजी विमुक्त जाती-जमातीच्या समाजाला स्वातंत्र्य प्रदान केले. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात मुक्ती दिन साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षी दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस भवनात भव्य कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस सदस्य गुरुदीपसिंग सप्पल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे प्रतोद आमदार राजेश राठोड, सचिव तथा हरियाणा प्रभारी जितेंद्र बगेल, माजी आमदार जलजा नायक, राष्ट्रीय प्रवक्ता आकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय समन्वयक व आयोजक एस.पी. सिंह लबाना, सुरजसिंग मंगा (पंजाब अध्यक्ष), रामजेठा नेतला (राजस्थान अध्यक्ष), शिवानंद एल पांचगी (कर्नाटक अध्यक्ष), रिसाल्ट टबरेज (दिल्ली अध्यक्ष), आमदार रामकरण काला यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सुरेश पवार, सुभाष तवर, डॉ. तुकाराम पवार, राजेश चव्हाण यांच्यासह विविध राज्यांतून बंजारा समाजातील प्रतिनिधी व महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top