वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती . यमुनाबाई मांगले, मा. प्रताप भैया देशमुख, मा. बाळासाहेब मांगले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यमुनाबाई मांगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मान्यवरांनी प्रबोधनकार ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान, प्रबोधनकार ठाकरे यांचे समाज प्रबोधन कार्य तसेच स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद करडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एम.डी. उंदरे व आभारप्रदर्शन प्रा. अजित तिकटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 
Top