धाराशिव (प्रतिनिधी)- परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा बसस्थानकाला आज अचानक भेट देत बसस्थानकाची पाहणी केली. तसेच येथील बस स्थानकावरील प्रवाशांशी संवाद साधला. स्थानकातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावेत. चौकशी कक्षात वाहतूक नियंत्रकांनी त्यांची नेमून दिलेली सेवा चोख बजवावी, आदी सह विविध सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या.