धाराशिव (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
सोहळ्याच्या प्रारंभी स्वातंत्र्य संग्रामातील अमर वीरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. चित्राताई प्रकाशराव मालखरे यांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या योगदानाची आठवण केली. कार्यक्रमादरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. या वेळी समितीचे सचिव दिलीप गणेश, उमाजीराव देशमुख, ॲड. सुग्रीव नेरे, प्रदीप गणेश, अण्णासाहेब वडगावकर, अरुण माडेकर, बालाजी जाधव, धनंजय माळी, मुख्याध्यापक पंडित जाधव, उषा माने यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत माळी यांनी केले
