भूम (प्रतिनिधी)-परांडा तालुक्यातील वाकडी येथील पुलावरून एका युवकाला पाण्याच्या प्रवाहात उतरून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुशील कोळेकर व वाकडी येथील ग्रामस्थांनी जीवाची बाजी लाऊन युवकाचे प्राण वाचवले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाऊस जोरदार बरसल्याने वाकडी पुलावर मध्यरात्री 3 वाजून 30 मिनिटांनी पाणी वाहण्यास सुरुवात झाली. दरम्यान कामा निमित साकत येथील युवक हनुमंत कांबळे दिनाक 16 सप्टेंबर रोजी बार्शी येथे बहिणीकडे गेला होते. रात्री पाऊस सुरू झाल्याने सदरील युवक याने बार्शी येथे बहिणीकडे मुक्काम केला. व 17 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता दुपत्या जनावरांची धार काढण्यासाठी तो साकत या गावाकडे निघाला. वाकडी फाट्यावर मोटरसायकल घेऊन कांबळे आले असता. पाणी वाहत होते. यामुळे ते थोड्या वेळ वाहत्या पाण्याचा अंदाज घेत थांबले. परंतु उशीर होऊ लागल्याने कांबळे यांनी मोटार सायकल वाकडी पुलावर वाहत असलेल्या पाण्यामध्ये घातली. मध्यभागी मोटरसायकल आल्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या मध्ये मोटार सायकल बंद पडून वाहून जाऊ लागली. या सोबत कांबळे ही वाहून जाऊ लागले होते. पण थोडक्यात बचावले.  कांबळे यांनी वाहत्या पाण्यात चिलारीच्या झाडाचा आधार घेतला व तातडीने बहिणीला संपर्क केला. कांबळे यांची बहीण व त्यांचे पती तातडीने वाकडी पुलावर आले व कांबळे यांना वाचवण्यासाठी हंबरडा फोडू लागले. यामुळे वाकडी गावातील नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने परांडा पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर व शाबाज शेख यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोळेकर व शेख 5 वाजता वाकडी पुलावर दाखल झाले व त्यांनी गावातील, राहुल कारभारी, अजित रगडे, विशाल लोंढे ,अक्षय पाठक ,श्रीराम जगताप व सुजित शिंदे  यांच्या मदतीने बचाव कार्यास सुरुवात केली. वाहत्या पाण्यात वायरोप घेऊन हनुमंत कांबळे यांच्या पर्यंत जीवाची बाजी लावून बचाव कार्यात कोळेकर व नागरिक त्या ठिकाणी पोहोचले व हनुमंताला काढण्यात पोलीस प्रशासन व वाकडी ग्रामस्थांना यश मिळाले. पाण्यात 1 तास कांबळे अडकल्याने घाबरले होते. यामुळे कांबळे यांना कोळेकर व ग्रामस्थानी धीर दिला. व थोड्या वेळाने गावाकडे सुखरूप पाठविले अशी माहिती बचाव कार्यात अग्रेसर आलेले कोळेकर यांनी लोकमतला दिली.



वाकडी येथील पूल हा 1978 साली झालेला आहे. याची वैधता अजून 3 वर्ष असली तरी. मागील 2 वर्षात या पुलावरून सतत पाणी वाहू लागल्याने भूम तालुक्यातील नागरिकांना बार्शी येथे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी यावरूनच जावे लागते. महत्वाची बाबा म्हणजे पुणे, कोल्हापूर व मुंबई या मोठ्या शहराकडे जाण्यासाठी देखील याच पुलावरून जावे लागते. यामुळे सतत नागरिकांची गैरसोय होऊ लागल्याने सदरील पुलाची उंची वाढून पूल नवीन बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

 
Top