भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पूरग्रस्त अतिवृष्टी बाधित शेतकरी कुटुंबाला जनसेवा नागरी सहकारी बँकेच्या वतीने, दैनंदिन गरजेच्या किराणा किट वाटप करण्यात आल्या.

वालवड, आंबी, पाथरूड येथील गरजवंत खरोखरच ज्यांना गरज आहे अशा लोकांना, दैनंदिन गरजेच्या किराणा किट वाटप करण्यात आल्या यावेळी जनसेवा बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे, व्हाईस चेअरमन जालिंदर मोहिते, यांच्यासह भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहन जाधव, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस आदम शेख, भाजपा जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर ,भूम तालुका उद्योग आघाडी अध्यक्ष रमेश बापू बगाडे, कामगार मोर्चा मराठवाडा कार्यकारणी सदस्य सचिन बारगजे, मा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रशांत मोहिते, समाधान बोराडे ,अच्युत गटकळ, पांडुरंग ढगे, बिभीषण टाळके, अंकुश गटकळ ,मनोज पवार ,बालाजी भोरे ,हरी उबाळे ,जनसेवा बँकेचे अधिकारी शिवाजी साठे, विश्वनाथ शेळके, शेखर कुलकर्णी, जाकीर शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top