भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यांच्या घरांचे आणि साहित्याचे मोठं प्रमाणात नुकसान झालेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवसेना निरीक्षक बाजीराव चव्हाण, सहसंपर्क प्रमुख भगवान देवकते यांच्या माध्यमातून पांडुरंग धस, सुनिल घाडगे यांच्या हस्ते बऱ्हाणपूर गावात पूरग्रस्त कुटुंबांना, जीवनावश्यक साहित्य, देऊन मदतीचा हात दिला आहे.
या जीवनावश्यक साहित्यामध्ये कपडे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, किराणा सामान, ब्लँकेट व औषधे सुद्धा दिलेली आहेत. कोणताही पूरग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी पालकमंत्री प्रताप सरनाईक पूर्णपणे घेत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक सुरक्षित कसा राहील याची सुद्धा काळजी आ.पालकमंत्री प्रताप सरनाईक घेत आहेत. यावेळी युवासेनेचे अजित पाटील बालाजी वारे किरण पाटील नितीन पाटील प्रदीप शेलार राहुल करडे गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.