तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील इ. 8 वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी अनन्या अविनाश पाडुळे हिची नवोदयसाठी निवड झाली आहे. अनन्या पाडुळे हिला बी. डी. कांबळे, एल. टी. चव्हाण, एस. यु. गोडसे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल मुख्याध्यापक जे. के.बेदरे, पर्यवेक्षक एस. एस.बळवंतराव यांनी अभिनंदन केले.
