धाराशिव (प्रतिनिधी)- अर्थ मंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्यामार्फत दि. 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार तात्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तात्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन दि. 1-5-2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र ग्रामीण बँक ही संपूर्ण शासकीय मालकीची बँक असून या बँकेचे भाग भांडवल हे भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे आहे.
या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या संगणकीय प्रणालीचे म्हणजेच कोर बँकिंग सेवा प्रणालीचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोड बँकिंग सेवा प्रणाली सोबतची एकत्रीकरण प्रक्रिया दि. 13 सप्टेंबर 2025 पासून ते 16 सप्टेंबर 2025 पर्यंत नियोजित करण्यात आलेली आहे. या एकत्रीकरण प्रक्रियेच्या कालावधीत सर्व डिजिटल व इतर बँकिंग सेवा जसे की ATM मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग UPI, RTGS, NEFT,IMPS, DBT, VKYC, आधार - आधारित पेमेंट प्रणाली, धनादेश वटविणे, स्थायी सूचना सहनियत आदेश (StandingInstruction&Mandates) या सर्व सेवा कालावधीत तात्पुरत्या विलंबित किंवा खंडित होऊ शकतात ही एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होतील .
यामुळे होणाऱ्या गैसवी बद्दल बँक दिलगिर आहे. असे बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे तसेच वरील कालावधीत येणाऱ्या तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पूर्व नियोजित व्यवस्था करण्याची ग्राहकांना नम्र विनंती बँकेच्या मार्फत करण्यात येत आहे कृपया कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास बँकेच्या नजीकच्या शाखेची अथवा WWW.mahagramin.in <http://www.mahagramin.in/> या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा महाराष्ट्र ग्रामीण बँक आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच दिनांक 15 सप्टेंबर 2025 पासून सर्व सेवा ग्राहकांसाठी पुन्हा सुरळीत होतील व त्या अधिक तत्पर व ग्राहकांसाठी अधिक सोयीच्या असणार आहेत असे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
