धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या स्वसंपादीत उत्पन्नातील 20 टक्के सेस योजनेतून इयत्ता 5 वी ते 12 वीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्याची योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील पूर्ण प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांचेकडे दि. 26 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

अर्जाचा विहीत नमुना,अटी-नियम व आवश्यक कागदपत्रांची यादी सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असून,अर्जाचे नमुने धाराशिव जिल्ह्याच्या संकेतस्थळावर dharashiv.nic.in तसेच www.zpdharashiv.gov.inयेथेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 
Top